होम लोन इंटरेस्ट रेट्स

सर्व रेट्स पॉलिसी रेपो रेट अनुरुप आहेत. वर्तमान लागू रेपो रेट = 6.50%

वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक) साठी विशेष होम लोन रेट्स
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन करिता* पॉलिसी रेपो रेट + 2.25% ते 3.15% = 8.75% ते 9.65%
वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित (व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक) साठी स्टँडर्ड होम लोन रेट्स
लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सर्व लोन करिता* पॉलिसी रेपो रेट + 2.25% ते 3.15% = 8.75% ते 9.65%

*वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स / EMI हे एच डी एफ सी बँक च्या ॲडजस्टेबल रेट होम लोन स्कीम (फ्लोटिंग इंटरेस्ट रेट) अंतर्गत लोन्ससाठी लागू आहेत आणि डिस्बर्समेंट च्या वेळी बदलू शकतात. वरील होम लोन इंटरेस्ट रेट्स एच डी एफ सी बँकच्या रेपो रेटसह लिंक केलेले आहेत आणि लोन च्या कालावधीमध्ये परिवर्तनीय आहेत. सर्व लोन्स एच डी एफ सी बँकच्या विवेकबुद्धीनुसार आहेत. वरील लोन स्लॅब आणि इंटरेस्ट रेट संबंधित अधिक तपशिलासाठी येथे क्लिक करा

 

*एचडीएफसी बँक कोणत्याही लेंडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर (LSPs) कडून कोणताही होम लोन बिझनेस सोर्स करीत नाही.

होम लोनसाठी डॉक्युमेंट्स

होम लोन मंजुरीसाठी तुम्हाला पूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला होम लोन ॲप्लिकेशन फॉर्मसह अर्जदार / सर्व सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे.

होम लोन शुल्क

होम लोन्सवर नॉन-हाऊसिंग शुल्क

होम लोन पात्रता

होम लोन पात्रता प्रामुख्याने उत्पन्न आणि परतफेड क्षमता यावर अवलंबून असते. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये कस्टमरचे प्रोफाईल, लोन मॅच्युरिटी वेळी वय, लोन मॅच्युरिटी वेळी प्रॉपर्टीचे वय, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्स रेकॉर्ड इ. समाविष्ट आहे. 

महत्त्वाचे घटक निकष
वय 18-70 वर्षे
व्यवसाय वेतनधारी / स्वयं-रोजगारित
राष्ट्रीयत्व निवासी भारतीय
कालावधी 30 वर्षांपर्यंत

स्वयं-रोजगारित व्यक्तींचे वर्गीकरण

स्वयं-रोजगारित व्यावसायिक स्वयं-रोजगारित गैर-व्यावसायिक (SENP)
डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, कन्सल्टंट, इंजिनीअर, कंपनी सेक्रेटरी इ. व्यापारी, कमिशन एजंट, कंत्राटदार इ.

सह-अर्जदार जोडल्याने लाभ कसा होतो? *

  • कमाई करणाऱ्या सह-अर्जदारासह जास्त लोन पात्रता.

*सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असण्याची आवश्यकता नाही. परंतु सर्व सह-मालकांनी लोनसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. सामान्यपणे, सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

 

कमाल फंडिंग**
₹30 लाखांपर्यंत आणि सहित लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%
₹30.01 लाखांपासून ₹75 लाखांपर्यंतचे लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%
₹75 लाखांपेक्षा अधिकचे लोन प्रॉपर्टी च्या किमतीच्या 90%

 

**एच डी एफ सी बँकेच्या मूल्यांकनानुसार प्रॉपर्टीचे बाजार मूल्य आणि कस्टमरच्या रिपेमेंट क्षमतेच्या अधीन.

 

विविध शहरांमध्ये होम लोन

मानपत्र

अघारा रविकुमार एम

एच डी एफ सी कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे डिस्बर्समेंट प्रोसेस अतिशय सोपी होती

मुरली शीबा

आमच्यासारख्या व्यस्त लोकांना त्रास-मुक्त अशी बँकला भेट न देता ऑनलाईन सर्व्हिस देण्याची बाब तर अगदी आयुष्य वाचवणारी आहे.

फ्रेडी व्हिन्सेंट एस व्ही

या आव्हानात्मक परिस्थितीत, संपूर्ण प्रोसेस अत्यंत सुलभ पद्धतीने पार पडली. विशेष म्हणजे उपस्थित केलेल्या शंकांचे कोणत्याही अडथळ्याशिवाय अत्यंत कमी वेळात समाधान करण्यात आले. चौकशी प्रक्रियेत सहभागी प्रत्येक व्यक्तीची वागणूक सौजन्यपूर्ण होती.

होम लोनसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होम लोन म्हणजे काय?

होम लोन हा सिक्युअर्ड लोनचा एक प्रकार आहे. कस्टमर घर खरेदी साठी प्राप्त करतात. प्रॉपर्टी ही डेव्हलपर कडून निर्माणाधीन किंवा तयार असलेली प्रॉपर्टी असू शकते, रिसेल प्रॉपर्टीची खरेदी असू शकते, जमिनीच्या प्लॉटवर हाऊसिंग युनिट बांधण्यासाठी, आधीच अस्तित्वात असलेल्या घरामध्ये सुधारणा आणि विस्तार करण्यासाठी आणि अन्य फायनान्शियल संस्थेकडून घेतलेले तुमचे विद्यमान होम लोन एच डी एफ सी बँकेकडे ट्रान्सफर करण्यासाठी असू शकते. हाऊसिंग लोन समान मासिक हप्त्यांद्वारे (EMI) परतफेड केले जाते, ज्यामध्ये उधार घेतलेल्या मुख्य भागाचा आणि त्यावर मिळालेला इंटरेस्ट असतो.

मी होम लोनसाठी अप्लाय कसे करू?

तुम्ही 4 जलद आणि सोप्या स्टेप्समध्ये एच डी एफ सी बँक होम लोन ऑनलाईन प्राप्त करू शकता:
1. साईन-अप / रजिस्टर करा
2. होम लोन ॲप्लिकेशन फॉर्म भरा
3. डॉक्युमेंट अपलोड करा
4. प्रोसेसिंग फी भरा
5. लोन मंजुरी मिळवा

तुम्ही होम लोनसाठी ऑनलाईनही अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्यासाठी https://portal.hdfc.com/ ला भेट द्या!.

मला कमाल किती होम लोन मिळेल?

तुम्हाला लोन रकमेवर अवलंबून एकूण प्रॉपर्टी किंमतीच्या 10-25% 'स्वत:चे योगदान' म्हणून देय करणे आवश्यक आहे. प्रॉपर्टी खर्चापैकी 75 ते 90% हाऊसिंग लोन म्हणून घेतले जाऊ शकते. कन्स्ट्रक्शन/होम इम्प्रूव्हमेंट/होम एक्सटेंशन लोन्सच्या बाबतीत, बांधकाम/सुधारणा/विस्तार अंदाजाच्या 75 ते 90% निधीपुरवठा केला जाऊ शकतो.

एच डी एफ सी बँक कडून होम लोन घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?

होम लोन पात्रता व्यक्तीचे उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेवर अवलंबून असते. कृपया होम लोन पात्रता निकषाचा तपशील पाहा:
 

विवरण वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती
वय 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंत 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंत
किमान उत्पन्न ₹10,000 p.m. ₹2 लाख p.a.

मला माझ्या हाऊसिंग लोनवर कर लाभ मिळेल का?

होय. तुम्ही प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C, 24(b) आणि 80EEA नुसार तुमच्या होम लोनच्या मुख्य आणि इंटरेस्ट घटकांच्या रिपेमेंटवर कर लाभांसाठी पात्र असू शकता. लाभ प्रत्येक वर्षी बदलू शकतात म्हणून, कृपया नवीन माहितीसाठी तुमच्या चार्टर्ड अकाउंटंट/टॅक्स एक्स्पर्टशी संपर्क साधा.

मी होम लोन डिस्बर्समेंट कधी घेऊ शकतो?

प्रॉपर्टी चे तांत्रिकदृष्ट्या मूल्यांकन केल्यावर, सर्व कायदेशीर डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यावर आणि तुम्ही तुमचे डाउन पेमेंट केल्यावर तुम्ही तुमच्या होम लोनचे डिस्बर्समेंट घेऊ शकता.
 

तुम्ही तुमच्या लोन डिस्बर्समेंटसाठी ऑनलाईन किंवा आमच्या कोणत्याही ऑफिसला भेट देऊन विनंती सादर करू शकता.

होम लोन पात्रता निर्धारित करणारे घटक कोणते आहेत?

होम लोनसाठी तुमची पात्रता निर्धारित करणारे काही घटक आहेत:
 

  • उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमता
  • वय
  • फायनान्शियल प्रोफाईल
  • क्रेडिट रेकॉर्ड
  • क्रेडिट स्कोअर
  • विद्यमान लोन/EMI

मी पात्र असलेली होम लोन रक्कम एच डी एफ सी बँक कशी ठरवेल?

एच डी एफ सी बँक मुख्यत्वे तुमच्या उत्पन्न आणि रिपेमेंट क्षमतेद्वारे तुमची होम लोन पात्रता निर्धारित करेल. इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये तुमचे वय, पात्रता, अवलंबून असलेल्यांची संख्या, तुमच्या पती/पत्नीचे उत्पन्न (जर असल्यास), मालमत्ता आणि दायित्व, सेव्हिंग्स रेकॉर्ड आणि व्यवसायाची स्थिरता आणि सातत्य यांचा समावेश होतो.

मी होम लोनसाठी ॲप्लिकेशन केव्हा करू शकेल?

जरी तुम्ही प्रॉपर्टी निवडली नसेल किंवा बांधकाम सुरू झाले नसेल तरीही, एकदा तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा किंवा बांधण्याचा निर्णय घेतला की कोणत्याही वेळी हाऊसिंग लोनसाठी अप्लाय करू शकता. भविष्यात तुमच्या भारतात परत येण्याचे प्लॅन करण्यासाठी तुम्ही परदेशात काम करत असतानाही तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करू शकता.

भारतात होम लोन कसे काम करते?

भारतातील होम लोन प्रोसेस सामान्यपणे खालील टप्प्यांमधून जाते:
 

होम लोन ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंटेशन

तुम्ही एच डी एफ सी बँकेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फीचरसह तुमच्या घरी बसून सहज आणि आरामात होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. वैकल्पिकरित्या, तुम्ही आमच्या लोन एक्स्पर्टना तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे लोन ॲप्लिकेशन पुढे नेण्यासाठी तुमचा संपर्क तपशील येथे शेअर करू शकता.

तुमच्या होम लोन ॲप्लिकेशन फॉर्मसह सबमिट करणे आवश्यक असलेले डॉक्युमेंटेशन येथे आहे. ही लिंक तुमच्या होम लोन ॲप्लिकेशनच्या प्रोसेसिंगसाठी आवश्यक KYC, उत्पन्न आणि प्रॉपर्टी संबंधित डॉक्युमेंट्सची तपशीलवार चेकलिस्ट प्रदान करते. चेकलिस्ट सूचक आहे आणि होम लोन मंजुरी प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त डॉक्युमेंटची मागणी केली जाऊ शकते.
 

होम लोनची मंजुरी आणि डिस्बर्समेंट

मंजुरी प्रोसेस: वर नमूद केलेल्या चेकलिस्ट नुसार सादर केलेल्या डॉक्युमेंट्स नुसार होम लोनचे मूल्यांकन केले जाते आणि मंजूर रक्कम कस्टमरला कळवली जाते. अप्लाय केलेली हाऊसिंग लोन रक्कम आणि मंजूर रक्कम मध्ये फरक असू शकतो. हाऊसिंग लोनच्या मंजुरीनंतर, लोन रक्कम, कालावधी, लागू इंटरेस्ट रेट, रिपेमेंट पद्धत आणि अर्जदारांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक इतर विशेष अटींचे तपशीलवार मंजुरी पत्र जारी केले जाते.

डिस्बर्समेंट प्रोसेस: होम लोन डिस्बर्समेंट प्रोसेस ही एच डी एफ सी बँकेकडे मूळ प्रॉपर्टी संबंधित डॉक्युमेंट्स सादर करण्याद्वारे सुरू होते. जर प्रॉपर्टी निर्माणाधीन प्रॉपर्टी असेल तर डेव्हलपरने प्रदान केलेल्या कन्स्ट्रक्शन लिंक्ड पेमेंट प्लॅननुसार ट्रांच मध्ये वितरण केले जाते. कन्स्ट्रक्शन/होम इम्प्रूव्हमेंट/होम एक्सटेंशन लोन्सच्या बाबतीत, प्रदान केलेल्या अंदाजानुसार बांधकाम/सुधारणेच्या प्रगतीनुसार डिस्बर्समेंट केले जाते. दुसऱ्या विक्री / पुनर्विक्री प्रॉपर्टीसाठी विक्री कराराच्या अंमलबजावणीच्या वेळी संपूर्ण लोनची रक्कम वितरित केली जाते.
 

होम लोनचे रिपेमेंट

होम लोनचे रिपेमेंट समान मासिक हप्ते (EMI) द्वारे केले जाते, जे इंटरेस्ट आणि मुख्य रकमेचे कॉम्बिनेशन आहे. पुनर्विक्री घरांसाठी लोनच्या बाबतीत, लोनचे डिस्बर्समेंट झालेल्या महिन्यानंतर EMI सुरू होते. बांधकाम अंतर्गत असलेल्या प्रॉपर्टी साठी लोनच्या बाबतीत, सामान्यत: एकदा बांधकाम पूर्ण झाल्यावर आणि हाऊस लोन पूर्णपणे वितरित झाले की EMI सुरू होते. तथापि ग्राहक लवकरच त्यांची EMI सुरू करण्याची निवड करू शकतात. बांधकामाच्या प्रगतीनुसार केलेल्या प्रत्येक आंशिक डिस्बर्समेंट सह EMI प्रमाणात वाढ होईल.

भारतात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे होम लोन कोणते आहेत?

खालील प्रकारचे होम लोन्स प्रॉडक्ट्स सामान्यपणे हाऊसिंग फायनान्स संस्था द्वारे भारतात ऑफर केले जातात:
 

होम लोन

हे लोन यासाठी घेतले जातात:

1 मंजूर प्रोजेक्टमध्ये खासगी डेव्हलपर्सकडून फ्लॅट, रो हाउस, बंगल्याची खरेदी;

2.DDA, म्हाडा तसेच विद्यमान सहकारी हाऊसिंग संस्था, अपार्टमेंट मालकांचे असोसिएशन किंवा विकास प्राधिकरणांच्या वसाहती किंवा खासगीरित्या बांधकाम केलेली घरे अशा प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन;

3.फ्रीहोल्ड / लीज होल्ड प्लॉट किंवा विकास प्राधिकरणाने आवंटित केलेल्या प्लॉटवर बांधकाम लोन
 

प्लॉट खरेदी लोन

प्रत्यक्ष वाटप किंवा दुसऱ्या विक्री व्यवहाराद्वारे तसेच अन्य बँक / फायनान्शियल संस्थेकडून घेतलेले तुमचे विद्यमान प्लॉट खरेदी लोन ट्रान्सफर करण्यासाठी प्लॉट खरेदी लोन घेतले जातात.
 

बॅलन्स ट्रान्सफर लोन

अन्य बँक / फायनान्शियल संस्थेकडून घेतलेले तुमचे थकित होम लोन एच डी एफ सी बँककडे ट्रान्सफर करणे याला बॅलन्स ट्रान्सफर लोन म्हणतात.
 

हाऊस रिनोव्हेशन लोन्स

हाऊस रिनोव्हेशन लोन हे टायलिंग, फ्लोअरिंग, अंतर्गत / बाह्य प्लास्टर आणि पेंटिंग इ. सारख्या अनेक मार्गांनी तुमच्या घराचे रिनोव्हेशन (स्ट्रक्चर / कार्पेट एरिया बदलल्याशिवाय) करण्यासाठी लोन आहे.
 

होम एक्सटेंशन लोन

अतिरिक्त रुम आणि फ्लोअर इ. बाबींसह तुमचे घर विस्तारित करण्यासाठी किंवा राहण्याची जागा वाढविण्यासाठी हे लोन उपयोगी आहे.

मी एकाच वेळी दोन होम लोन प्राप्त करू शकतो/शकते का?

होय.. तुम्ही एकाच वेळी दोन होम लोन प्राप्त करू शकता. तथापि, तुमच्या लोनची मंजुरी तुमच्या रिपेमेंट क्षमतेवर अवलंबून असते. तुमची पात्रता आणि दोन होम लोनसाठी EMI परतफेड करण्याची क्षमता याचे मूल्यांकन करणे एच डी एफ सी बँकेच्या निर्णयावर आहे.

मी होम लोनची परतफेड कशी करू?

तुमच्या सोयीसाठी, एच डी एफ सी बँक तुमच्या हाऊस लोनच्या रिपेमेंटसाठी विविध पद्धती ऑफर करते. तुम्ही ECS (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम) द्वारे हप्ते भरण्यासाठी तुमच्या बँकरला स्थायी निर्देश जारी करू शकता, तुमच्या नियोक्त्याद्वारे मासिक हप्त्यांची थेट कपात निवडू शकता किंवा तुमच्या सॅलरी अकाउंटमधून पोस्ट-डेटेड चेक जारी करू शकता.

तुमच्या होम लोनच्या रिपेमेंटसाठी मान्यता असलेला कमाल कालावधी किती आहे?

कमाल रिपेमेंट कालावधी तुम्ही घेत असलेल्या हाऊसिंग लोनच्या प्रकारावर, तुमचे प्रोफाईल, वय, लोन मॅच्युरिटी इ. वर अवलंबून असते.

होम लोन आणि बॅलन्स ट्रान्सफर लोनसाठी, कमाल कालावधी 30 वर्ष किंवा निवृत्तीचे वय होईपर्यंत, जे कमी असेल ते.

होम एक्सटेंशन लोनसाठी, कमाल कालावधी 20 वर्ष किंवा निवृत्तीचे वय होईपर्यंत, जे कमी असेल ते.

होम रिनोव्हेशन आणि टॉप-अप लोनसाठी, कमाल कालावधी 15 वर्ष किंवा निवृत्तीचे वय होईपर्यंत, जे कमी असेल ते.

माझे होम लोन EMI कधी सुरू होतात?

लोन डिस्बर्समेंट झालेल्या महिन्यानंतरच्या महिन्यापासून EMI सुरू होते. अंडर-कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी लोनसाठी EMI सामान्यपणे संपूर्ण होम लोन डिस्बर्समेंट झाल्यानंतर सुरू होते परंतु कस्टमर त्यांचे पहिले डिस्बर्समेंट मिळाल्यानंतर त्यांचे EMI सुरू करू शकतात आणि प्रत्येक नंतरच्या डिस्बर्समेंटच्या प्रमाणात त्यांचे EMI वाढेल. रि-सेल प्रकरणांसाठी, संपूर्ण लोन रक्कम एकाच वेळी वितरित केल्याने, संपूर्ण लोन रकमेवर EMI डिस्बर्समेंटच्या महिन्यानंतर सुरू होते

होम लोनवरील प्री-EMI म्हणजे काय?

प्री-EMI हा तुमच्या होम लोनवरील इंटरेस्टचे मासिक पेमेंट आहे. लोनचे पूर्ण डिस्बर्समेंट होईपर्यंत ही रक्कम कालावधीदरम्यान भरली जाते. तुमचा वास्तविक लोन कालावधी - आणि EMI (मुख्य आणि इंटरेस्ट दोन्ही समाविष्ट) पेमेंट प्री-EMI फेज संपल्यानंतर म्हणजेच हाऊस लोन पूर्णपणे डिस्बर्समेंट झाल्यानंतर सुरू होतो.

माझ्या हाऊसिंग लोनसाठी सह-अर्जदार कोण असू शकतो?

प्रॉपर्टीचे सर्व सह-मालक हाऊस लोनमध्ये सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. सामान्यपणे, सह-अर्जदार जवळच्या कुटुंबातील सदस्य असतात.

होम लोन कालावधी दरम्यान इंटरेस्ट रेट बदलतात का?

तुमचे हाऊसिंग लोन इंटरेस्ट रेट तुम्ही निवडलेल्या लोन प्रकारावर अवलंबून असते. दोन प्रकारचे लोन आहेत:
 

ॲडजस्टेबल रेट किंवा फ्लोटिंग रेट

ॲडजस्टेबल किंवा फ्लोटिंग रेट लोनमध्ये, तुमच्या लोनवरील इंटरेस्ट रेट तुमच्या लेंडरच्या बेंचमार्क रेटसह लिंक केले आहे. बेंचमार्क रेटमधील कोणताही बदल तुमच्या लागू असलेल्या इंटरेस्ट रेटमध्ये सप्रमाण बदल घडवून आणेल. इंटरेस्ट रेट्स निश्चित कालावधी नंतर रिसेट केले जातात. अशाप्रकारचे रिसेट फायनान्शियल कॅलेंडर नुसार असू शकतात किंवा डिस्बर्समेंटच्या पहिल्या तारखेनुसार प्रत्येक कस्टमरसाठी युनिक असू शकतात. एच डी एफ सी बँक लोन कराराच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही क्षणी आपल्या स्वत:च्या विवेकबुद्धीनुसार संभाव्य आधारावर इंटरेस्ट रेट रिसेट सायकल बदलू शकते.
 

कॉम्बिनेशन लोन्स

कॉम्बिनेशन लोन हे अंशत: फिक्स्ड आणि अंशत: फ्लोटिंग असतात. फिक्स्ड रेट कालावधी नंतर, लोन ॲडजस्टेबल रेट मध्ये स्विच होतात.

मी माझी थकित हाऊसिंग लोन रक्कम प्रीपे करू शकतो/शकते का?

होय. तुम्ही तुमचा वास्तविक लोन कालावधी पूर्ण होण्यापूर्वी तुमचे होम लोन प्रीपे करू शकता (अंशत: किंवा पूर्ण). कृपया लक्षात घ्या की बिझनेसच्या उद्देशाने त्याचा लाभ घेतल्याशिवाय फ्लोटिंग रेट होम लोनवर कोणतेही प्रीपेमेंट शुल्क नाही.

मला होम लोन हमीदाराची गरज आहे का?

नाही. तुमच्या होम लोनसाठी तुमच्याकडे हमीदार असण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ विशिष्ट परिस्थितीत हमीदाराची मागणी केली जाईल, म्हणजेच:
 

  • जेव्हा प्राथमिक अर्जदाराकडे कमकुवत फायनान्शियल स्थिती असते
  • जेव्हा अर्जदाराला त्यांच्या पात्रतेच्या पलीकडे असलेली रक्कम उधार घ्यायची असते.
  • जेव्हा अर्जदार प्रस्थापित किमान उत्पन्न निकषापेक्षा कमी कमवतो.

होम लोन इन्श्युरन्स घेणे अनिवार्य आहे का?

नाही. होम लोन इन्श्युरन्स अनिवार्य नाही. तथापि, तुम्ही कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीपासून संरक्षणासाठी इन्श्युरन्स खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

होम लोन तात्पुरते सर्टिफिकेट म्हणजे काय आणि मला कसे मिळू शकेल?

होम लोन तात्पुरते सर्टिफिकेट हे इंटरेस्टचा सारांश आहे आणि फायनान्शियल वर्षादरम्यान तुमच्या होम लोनसाठी तुम्ही रिपेड केलेली मुख्य रक्कम आहे. हे तुम्हाला एच डी एफ सी बँकेद्वारे प्रदान केले जाते आणि कर कपातीचा क्लेम करण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्ही विद्यमान कस्टमर असाल तर तुम्ही सहजपणे तुमचे तात्पुरते होम लोन तात्पुरते सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता, त्यासाठी भेट द्या आमचे ऑनलाईन पोर्टल .

मला कमी उत्पन्न डॉक्युमेंटसह होम लोन मिळू शकेल का?

आमचे एच डी एफ सी बँक रीच लोन्स सूक्ष्म-उद्योजक आणि वेतनधारी व्यक्तींसाठी घर खरेदी करणे शक्य करते ज्यांच्याकडे उत्पन्नाच्या डॉक्युमेंटेशनचा पुरेसा पुरावा असू शकतो किंवा नसूही शकतो. तुम्ही एच डी एफ सी बँक रीच सह किमान उत्पन्न डॉक्युमेंटेशन सह हाऊस लोनसाठी अप्लाय करू शकता.

होम लोन चे आंशिक / त्यानंतरचे डिस्बर्समेंट म्हणजे काय?

निर्माणाधीन असलेल्या प्रॉपर्टी करता बांधकामाच्या प्रगतीच्या आधारावर एच डी एफ सी बँक लोन चे वाटप हप्त्यांमध्ये करते. वितरित केलेला प्रत्येक हप्ता 'आंशिक' किंवा 'त्यानंतरचे' डिस्बर्समेंट म्हणून ओळखले जाते.

मी कोणती प्रॉपर्टी खरेदी करावी हे ठरवताना मला होम लोन ची मंजुरी मिळू शकेल का?

तुम्ही प्री-ॲप्रूव्ह्ड होम लोनसाठी अप्लाय करू शकता जे तुमचे उत्पन्न, पत व फायनान्शियल स्थितीच्या आधारावर दिलेल्या लोनसाठी इन-प्रिन्सिपल मंजुरी आहे. सामान्यपणे, प्रॉपर्टी निवडण्यापूर्वी प्री-ॲप्रूव्ह्ड लोन घेतले जातात आणि लोन मंजुरीच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी वैध असतात.

PMAY योजना म्हणजे काय आणि होम लोन खरेदीदारांना कसा लाभ मिळू शकेल?

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) (शहरी)- सर्वांसाठी घरे या ध्येयाने घराच्या मालकीत वाढ करण्याच्या उद्दिष्टाने भारत सरकारने हाती घेतलेला उपक्रम आहे. PMAY योजना भारतातील शहरीकरण आणि परिणामी गृहनिर्माण मागण्यांच्या अंदाजानुसार, समाजातील आर्थिक दुर्बल विभाग (EWS) / निम्न उत्पन्न गट(LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG)यांना सेवा पुरविते.

लाभ:
PMAY अंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीममुळे (CLSS) होम फायनान्स माफक ठरते कारण इंटरेस्टच्या घटकावर देण्यात येणाऱ्या सबसिडीमुळे होम लोनवरील कस्टमरचा आऊटफ्लो कमी होतो. स्कीम अंतर्गत अनुदानाची रक्कम मुख्यत्वे कस्टमरच्या उत्पन्नाची कॅटेगरी आणि ज्या प्रॉपर्टीकरिता फायनान्स केला जात आहे तिचा आकार यावर अवलंबून असते.

होम लोन कसे मिळवावे?

एच डी एफ सी बँकेकडून होम लोन मिळवणे हे एक सोपे आहे आणि त्यामध्ये स्थिर उत्पन्न, चांगले क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्नाचे वाजवी डेब्ट-टू-इन्कम रेशिओ यासारख्या विशिष्ट निकषांची पूर्तता करणे समाविष्ट आहे. लोन रक्कम क्रेडिट पात्रता आणि इतर बँक धोरणांसारख्या घटकांद्वारे निर्धारित केली जाते. आवश्यक डॉक्युमेंट्समध्ये उत्पन्नाचा पुरावा, KYC, रोजगार पडताळणी आणि मालमत्ता आणि कर्जाविषयी तपशील समाविष्ट आहेत. मंजुरी संधी वाढविण्यासाठी, निरोगी क्रेडिट स्कोअर राखण्याचा, डाउन पेमेंटसाठी सेव्ह करण्याचा आणि थकित कर्ज कमी करण्याचा सल्ला दिला जातो. फिक्स्ड-रेट, ॲडजस्टेबल-रेट इत्यादींसह विविध लोन प्रकार विविध गरजा पूर्ण करतात, ज्यामुळे कर्जदारांना त्यांच्या आर्थिक परिस्थिती आणि प्राधान्यांसह सर्वोत्तम सूट होणार पर्याय निवडण्याची अनुमती मिळते.

Oct'23 ते Dec'23 कालावधी दरम्यान कस्टमरला ऑफर केलेले रेट्स
भाग आयआरआर एप्रिल
किमा कमाल सरासरी. किमा कमाल सरासरी.
गृहनिर्माण 8.30 12.60 8.48 8.30 12.60 8.48
नॉन-हाऊसिंग* 8.35 13.55 9.23 8.35 13.55 9.23
*नॉन-हाऊसिंग = LAP (इक्विटी), नॉन-रेसिडेन्शियल प्रीमायसेस आणि इन्श्युरन्स प्रीमियम फंडिंग लोन  

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!