इंटरेस्ट रेट्स

स्टँडर्ड रेट्स 

लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
सेल्फ ऑक्युपाईड रेसिडेन्शियल प्रॉपर्टी 8.95 - 9.95
नॉन-सेल्फ ऑक्युपाईड रेसिडेन्शियल प्रॉपर्टी 9.25 - 10.25


रिटेल प्राईम लेंडिंग रेट (नॉन-हाऊसिंग): 12.20%

लोन स्लॅब इंटरेस्ट रेट्स (% p.a.)
कमर्शियल प्रॉपर्टी 9.25 - 10.25

 

*एचडीएफसी बँक कोणत्याही लेंडिंग सर्व्हिस प्रोव्हायडर (LSPs) कडून कोणताही होम लोन बिझनेस सोर्स करीत नाही.

डॉक्युमेंट्स

लोन मंजुरीसाठी पूर्ण आणि स्वाक्षरी केलेल्या ॲप्लिकेशन फॉर्मसह तुम्हाला सर्व अर्जदार / सह-अर्जदारांसाठी खालील डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे.

फी आणि शुल्क

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी लाभ

कस्टमाईज्ड रिपेमेंट पर्याय

तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष लोन.

सुलभ डॉक्युमेंटेशन

किमान डॉक्युमेंट्स सह अप्लाय करा, वेळ आणि प्रयत्न वाचवा.

24x7 सहाय्य

चॅट, व्हॉट्सॲप वर कधीही, कुठेही आमच्याशी संपर्क साधा!

ऑनलाईन लोन अकाउंट

तुमचे लोन सहजपणे मॅनेज करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा.

प्रमुख वैशिष्ट्ये

संपूर्ण बांधकाम झालेल्या, पूर्ण मालकीच्या निवासी आणि कमर्शियल प्रॉपर्टी वर लोन : बिझनेस गरजा; विवाह, वैद्यकीय खर्च आणि इतर वैयक्तिक गरजा; अन्य बॅंक / फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमधून घेतलेले तुमचे थकित लोन ट्रान्सफर करण्यासाठी.

सुलभ आणि त्रास-मुक्त डॉक्युमेंटेशन.

मासिक हप्त्यांद्वारे सहज रिपेमेंट.

भारतात कुठेही लोनचा लाभ घेण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी एकीकृत शाखा नेटवर्क.

दीर्घ कालावधी, कमी EMI.

आकर्षक इंटरेस्ट रेट.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी पात्रता

महत्त्वाचे घटक निकष
वय 21-65 वर्षे
व्यवसाय वेतनधारी / स्वयं-रोजगारित
राष्ट्रीयत्व निवासी भारतीय
कालावधी 15 वर्षांपर्यंत

स्वयं-रोजगारित व्यक्तींचे वर्गीकरण

स्वयं-रोजगारित व्यावसायिक स्वयं-रोजगारित गैर-व्यावसायिक (SENP)
डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, कन्सल्टंट, इंजिनीअर, कंपनी सेक्रेटरी इ. व्यापारी, कमिशन एजंट, कंत्राटदार इ.

सह-अर्जदार जोडल्याने लाभ कसा होतो? *

  • कमाई करणाऱ्या सह-अर्जदारासह जास्त लोन पात्रता.
  • सह-अर्जदार म्हणून महिला सह-मालक जोडल्यास कमी इंटरेस्ट रेट.

*सर्व सह-अर्जदारांना सह-मालक असण्याची आवश्यकता नाही. परंतु सर्व सह-मालकांनी लोनसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. सामान्यपणे, सह-अर्जदार जवळचे कौटुंबिक सदस्य असतात.

 

कमाल फंडिंग

विद्यमान एच डी एफ सी कस्टमर्स नवीन कस्टमर्स

सर्व विद्यमान लोन वरील मूळ थकबाकी आणि मिळालेले लोन अगेंस्ट प्रॉपर्टी एकत्रितपणे एच डी एफ सी बँक ने मूल्यांकन केल्यानुसार गहाण प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या 60% पेक्षा जास्त नसावे.

मिळालेले लोन अगेंस्ट प्रॉपर्टी, सामान्यपणे, एच डी एफ सी बँकने मूल्यांकन केल्यानुसार प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या 50% पेक्षा जास्त नसावे.

विविध शहरांमध्ये होम लोन

मानपत्र

अघारा रविकुमार एम

एच डी एफ सी कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे डिस्बर्समेंट प्रोसेस अतिशय सोपी होती

मुरली शीबा

आमच्यासारख्या व्यस्त लोकांना त्रास-मुक्त अशी बँकला भेट न देता ऑनलाईन सर्व्हिस देण्याची बाब तर अगदी आयुष्य वाचवणारी आहे.

फ्रेडी व्हिन्सेंट एस व्ही

या आव्हानात्मक परिस्थितीत, संपूर्ण प्रोसेस अत्यंत सुलभ पद्धतीने पार पडली. विशेष म्हणजे उपस्थित केलेल्या शंकांचे कोणत्याही अडथळ्याशिवाय अत्यंत कमी वेळात समाधान करण्यात आले. चौकशी प्रक्रियेत सहभागी प्रत्येक व्यक्तीची वागणूक सौजन्यपूर्ण होती.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी म्हणजे काय?

प्रॉपर्टी सापेक्ष लोन हे एक सुरक्षित लोन आहे ज्याद्वारे फायनान्शियल संस्था पूर्णपणे बांधकाम केलेल्या, फ्रीहोल्ड निवासी आणि कमर्शियल प्रॉपर्टी सापेक्ष प्रदान करतात. वैयक्तिक आणि बिझनेसच्या गरजांसाठी (तार्किक उद्देशांव्यतिरिक्त) जसे विवाह, वैद्यकीय खर्च आणि मुलांचे शिक्षण इ. साठी मॉर्टगेज लोन घेतले जाऊ शकते. अन्य बँक आणि फायनान्शियल संस्थांमधून विद्यमान लोन अगेंस्ट प्रॉपर्टी देखील एच डी एफ सी बँकेत ट्रान्सफर केले जाऊ शकते.

प्रॉपर्टीवर मी LAP म्हणून जास्तीत जास्त किती फंडिंग मिळवू शकतो/शकते?

विद्यमान कस्टमर्स साठी, सध्याच्या सर्व लोन वरील मुख्य थकित आणि प्रॉपर्टी वरील लोन एकत्रितपणे, एच डी एफ सी बँकेने मूल्यांकन केलेल्या गहाण प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या 60% पेक्षा अधिक नसावे. नवीन कस्टमर्स साठी, प्रॉपर्टीसाठी घेतले जाणारे लोन, साधारणपणे, एच डी एफ सी बँकेने मूल्यांकन केल्याप्रमाणे प्रॉपर्टीच्या बाजार मूल्याच्या 50% पेक्षा जास्त नसावे.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (LAP) कोण घेऊ शकेल?

वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित व्यक्ती दोघेही वैयक्तिक आणि बिझनेस गरजांसाठी (जोखमीच्या उद्देशांव्यतिरिक्त) जसे, विवाह, मुलांचे शिक्षण, बिझनेस विस्तार, लोनचे एकत्रीकरण इत्यादीसाठी लोन अगेंस्ट प्रॉपर्टीचा (LAP) लाभ घेऊ शकतात.

कमाल किती कालावधीसाठी मला लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (LAP) मिळू शकेल ?

तुम्ही जास्तीत जास्त 15 वर्ष कालावधीसाठी किंवा निवृत्तीचे वय होईपर्यंत, जे काही कमी असेल ते, लोन अगेंस्ट प्रॉपर्टी घेऊ शकता.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (LAP) घेण्यासाठी मला कोणती सिक्युरिटी प्रदान करण्याची आवश्यकता आहे ?

लोनची सिक्युरिटी सामान्यतः आमच्याकडून फायनान्स होत असलेली प्रॉपर्टी आणि / किंवा आमच्याद्वारे आवश्यक असेल अशी इतर कोणतीही कोलॅटरल / अंतरिम सिक्युरिटी असेल.

मला कमर्शियल प्रॉपर्टीकरिता लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (LAP) मिळू शकेल का?

होय, पूर्णपणे बांधकाम झालेल्या आणि स्वतःच्या संपूर्ण मालकीच्या कमर्शियल प्रॉपर्टी वर लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (LAP) मिळू शकते .

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी आवश्यक डॉक्युमेंट्स काय आहेत?

तुम्ही आवश्यक डॉक्युमेंट्स आणि लागू फी व शुल्कांशी संबंधित चेकलिस्ट https://www.hdfc.com/checklist#documents-charges वर शोधू शकता

कृपया आमच्या लोन एक्स्पर्ट कडून कॉल मिळवण्यासाठी तुमचे तपशील शेअर करा!